मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा अभियानातंर्गत सरस्वती विद्यालय शेगांव (कुंड) * च्या वतीने क्रीड़ासत्र व स्नेह संमेलन थाटात सम्पन्न

मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा अभियानातंर्गत    सरस्वती विद्यालय शेगांव (कुंड) * च्या वतीने क्रीड़ासत्र व स्नेह संमेलन थाटात सम्पन्न        सरस्वती विद्यालय, शेगांव(कुंड) येथे २३...

मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा अभियानातंर्गत    सरस्वती विद्यालय शेगांव (कुंड) * च्या वतीने क्रीड़ासत्र व स्नेह संमेलन थाटात सम्पन्न        सरस्वती विद्यालय, शेगांव(कुंड) येथे २३ जानेवारी रोज मंगळवार  सकाळी ११.३० ते ५.०० वाजता  पर्यंत क्रीड़ासत्राचे आयोजन केले होते .प्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस   यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेश झाडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. 

          मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा अभियानातंर्गत* विद्यार्थ्या कडून शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करून रांगोली काढून वर्ग सजावट केली.  विद्यार्थ्याचे  गीत,भाषण घेण्यात आले त्यानंतर क्रीड़ा व सांस्कृतिक प्रमुख श्री गणेश इतवारे व मुख्याध्यापक श्री राजेश झाडे यांच्या हस्ते कबड्डी ग्राउंड चे पुजन करून नेताजी सुभाषचंद्र बोस  यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करून  क्रीड़ा संमेलनाला  सुरवात  करण्यात आली. कब्बड्डी,लंगड़ी,रेस,रंगोली स्पर्धा,वक़्तृत्व स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला.

      दिनांक २४/०१/२०२४ ला स्नेह संमेलन चे उद्घाटन ११.०० वाजता कार्यक्रमाचे अध्यक्ष :मा. डॉ. वसंतराव बोंडे (माजी आमदार)अध्यक्ष ग्राम गौरव शिक्षण संस्था, हिंगणघाट प्रमुख पाहुणे : मा. दिपालीताई की. वंजारी सरपंच, शेगाव (कुंड)  मा. मधुसूदनजी हरणे (माजी जि.प. सदस्य) मा. श्री. जगदीश वांदिले अध्यक्ष (आधार फाउंडेशन) मा. श्री. धनराज कोल्हे (माजी मुख्याध्यापक),मा.श्री प्रशांत किलन्नाके अध्यक्ष शाळा व्यवस्थापन जि.प.शाळा, शेगाव (कुंड),मा. श्री. विजय किलनाके माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन जि.प.शाळा, शेगाव (कुंड),मा. श्री. नितीन भगत सदस्य ग्रा. शेगाव (कुंड) मा. श्री. सचिन ठावरी पोलीस पाटील, शेगाव (कुंड) मा श्री. संजय झाडे मुख्याध्यापक जी.प.शाळा, शेगाव (कुंड) यांच्या उपस्थिति मधे माता सरस्वती व क्रान्तिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरवात करण्यात आली.

  प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेश झाडे यांनी शाळेची प्रगती अहवाल केला.

 अध्यक्षीय भाषनात मा. डॉ. वसंतराव बोंडे (माजी आमदार)अध्यक्ष ग्राम गौरव शिक्षण संस्था, हिंगणघाट यांनी  शैक्षणिक व सामाजिक परिवर्तनासाठी स्नेह संमेलना  बद्दल माहिती सांगितली. श्री मा. मधुसूदनजी हरणे (माजी जि.प. सदस्य)  यांनी  क्रीड़ा सत्राचे महत्व सांगितले तर मा. दिपालीताई की. वंजारी सरपंच, यांनी शाळेमधे खेळ, सांस्कृतिक सोबतच स्पर्धा परीक्षा आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

 प्रमुख पाहुने मा. श्री. जगदीश वांदिले अध्यक्ष (आधार फाउंडेशन) यांनी विद्यार्थ्यासाठी क्रीड़ासत्र व स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याने त्यात सर्वानी हिरारिने भाग घेऊन व्यक्तिगत व्यक्तिमत्व विकास, संघटन,चिकाटि यासारखे गुण विकसित करता येते त्यातूनच भाषण कौशल विकसित करता येते असे प्रतिपादन केले.त्या नंतर 

देवा श्री गणेशा,देश रंगीला,लावणी, रिमिक्स,चढविला पट्टा कमरेवरी,चंद्रा लावणी,मला म्हणतात पुण्याची मैना,असं काय करता,चला जेजुरीला जाऊ,एकच राजा इथे जन्मला,झुमके ठुमके,दिल है हिंदुस्तानी,चक चक सोन्यानं भरली ओटी,घुंगट मे चाँद होगा,पाटलाचा बैलगाडा,अमर पारा तुमर पारा,प्रीतीच्या झुल्यात झुलवा,शंभुराजे,केळेवाली,भिमाच गाण,मै निकला गडी लेके,दैवत छत्रपति,लल्लाटी भंडार,ओ देश मेरे ,लावणी देश रंगीला,मैने पायल है छनकाई इत्यादि सिंगल व ग्रुप डांस ,नाटक, लावणी व देश भक्ति गीत सादर करण्यात आले.

          बक्षिस वितरण कार्यक्रमः २४ जानेवारी २०२४ रोज बुधवार, वेळ: दुपारी ४ वा.करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष : मा.श्री. गौरवजी बोंडे सचिव ग्राम गौरव शि.सं. हिंगणघाट * कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ।

मा. श्री. राजूभाऊ चाफले अध्यक्ष संत तुकडोजी पतसंस्था, हिंगणघाट मा. रेखाताई हरणे माजी जि.प.सदस्य मा. तुकारामजी मुंडे (कर सल्लागार)  मा. श्री. तुकारामजी पंढरे मुख्याध्यापक, सरस्वती विद्यालय पाईकमारी यांचे हस्ते देण्यात आली.

  कार्यक्रमाला  शिक्षक व  शिक्षकेत्तर कर्मचारी व माजी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ.अर्चना मांडवकर व श्री अरविंद कोपरे यांनी तर आभार कु.फूलकर मैडम यांनी केले.


रिपोर्टर

संबंधित पोस्ट